संकीर्ण महसूल आकारणीच्या आदेशावर कार्यवाही कशी करावी?

प्रश्‍न :-

संकीर्ण महसूल आकारणीच्या आदेशावर कार्यवाही कशी करावी?

उत्तर :-

सक्षम अधिकार्‍याच्या संकीर्ण महसूल आकारणीच्या आदेशाच्या दोन प्रती तहसिल कार्यालयाकडे पाठविल्या जातात.

  1. तहसिल कार्यालयातील जमाबंदी लिपीकाने या आदेशाची नोंद तालुका नमुना चार मध्ये संबंधीत गावाच्या पानावर घ्‍यावी व आदेशाची दुसरी प्रत संबंधीत तलाठी यांचेकडे पाठवावी.
  2. जमाबंदी लिपीकाकडून प्राप्त झालेल्या या आदेशाच्या प्रतीच्या माहितीवरून तलाठी यांनी गाव नमुना नंबर चार मध्ये याची नोंद घ्यावी.
  3. संकीर्ण जमीन महसुलाची वसूली झाल्यानंतर वसूलीची सविस्तर माहिती, चलन नंबरसह वसुली करणार्‍या अधिकारी / कर्मचार्‍याने जमाबंदी लिपीकास व संबंधीत तलाठी यांना कळवावी.
  4. अशा वसुलीची नोंद जमाबंदी लिपीकाने तालुका नमुना सात मध्ये घ्यावी व संबंधीत तलाठी यांनी अशा वसुलीची नोंद गाव नमुना नंबर आठ ब मध्ये घ्यावी.
  5. दरवर्षी जुलै/ऑगस्ट महिन्यात गाव आणि तालुका पातळीवर या हिशोबांचा मेळ घेण्यात यावा.
  6. वाढीव शेतसारा हा एका वर्षासाठी निश्‍चित केला जात असल्याने त्याला ‘संकीर्ण जमीन महसूल’ म्हणण्यात येते, त्यामुळे वाढीव शेतसार्‍याची नोंद गाव नमुना नंबर चार मध्ये घ्यावी. वाढीव शेतसारा स्‍थानिक उपकरांतुन मुक्‍त असतो.
  7. शेतीसाठी उपयोगात येणार्‍या जमिनीवरील महसुलाची नोंद (गाव नमुना नंबर एक, दोन, तीन, चार आणि आठ ब मध्ये करावी.

Related Posts

Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in

Post a Comment