प्रश्न :-
महसुल मूक्त किंमत म्हणजे काय?उत्तर :-
महाराष्ट्र जमिन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम १९७१, नियम २(ल)(एक) अन्वये महसूल मूक्त किंमत ची व्याख्या दिलेली आहे. शासनामार्फत जमीन प्रदान करतांना प्रथम जागेची चालू बाजार भावाप्रमाणे किंमत ठरवावी. यासाठी
- (अ) त्या वस्तीतील तशाच प्रकारच्या जमिनीच्या विक्रीची किंमत (
- (ब) इमारती जागेचे ठिकाण
- (क) तशाच प्रकारच्या जमिनीची उपलब्धता आणि तिच्यासाठी असलेली मागणी
- (ड) भूमिसंपादन अधिनियमान्वये जमिनीची किंमत ठरवितांना जे घटक विचारात घेण्यात येतात ते घटक विचारात घ्यावेत.
उपरोक्त सर्व बाबी विचारात घेऊन किंमत ठरविणेपूर्वी लगतच्या ५ वर्षीच्या व्यवहाराचा खरेदी विक्री तक्ता (दर हेक्टरी किंमतीचा) तयार करावा. असा तक्ता लगतच्या ५ वर्षीच्या व्यवहाराचा नसणे, ज्या जमीनीची मागणी करणेत आली आहे त्या परिसरातील जमीनीचा नसणे, एकाच तक्त्यात एकर-गुंठे व हेक्टर-आर या परिणामातील जमीनी नमुद करणे अशा प्रकारच्या चुका टाळाव्यात.
वरीलप्रमाणे जमीनीची किंमत ठरविले नंतर खालील प्रमाणे “महसुल मूक्त” किंमत काढावी.
- (१) मागणी जागेचे क्षेत्र (चौ. मी.)
- (२) मागणी जागेच्या वार्षिक बिनशेती सार्याच्या ३० पट रक्कम
- (३) अधिक मागणी जागेची किंमत
- (४) (२)+(३) म्हणजेच महसुल मूक्त किंमत.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in