प्रश्न :-
अवैधरित्या केलेल्या गौण खनिज उत्खननासाठी कितीपट दंड करता येतो?उत्तर :-
म.ज.म.अ. १९६६ चे कलम ४८ (७)(क) अन्वये अवैधरित्या केलेल्या गौण खनिज उत्खननासाठी दिनांक १२/६/२०१५ च्या अध्यादेशानुसार बाजारभावाच्या पाचपट दंड करण्याचे अधिकार तहसिलदारपेक्षा कमी दर्जाचा नाही अशा अधिकार्यास आहेत.
म.ज.म.अ. १९६६ चे कलम ४८ (८)(१) अन्वये अवैधरित्या केलेल्या गौण खनिज उत्खननासाठी, हलविण्यासाठी वापरात आणलेले वाहन, यंत्र, साधन सामग्री सरकार जमा करण्याचे अधिकार दिनांक १२/६/२०१५ च्या अध्यादेशानुसार तहसिलदारपेक्षा कमी दर्जाचा नाही अशा अधिकार्यास आहेत.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in