प्रश्न :-
झाडांबाबत तलाठी यांची कर्तव्ये काय आहेत?उत्तर :-
अभिलेखात झाडाच्या नोंदी अचूकपणे लिहाव्यात, नवीन झाडे लावली असतील तर त्यांच्या नोंदी अभिलेखात तात्काळ घेण्यात याव्यात,
जमीन हस्तांतरणाचे व्यवहार नोंदवितांना झाडांच्या हक्काबाबत काय व्यवहार झाला आहे याची नोंद न चुकता घ्यावी,
पिक पहाणीच्या वेळेस अभिलेखातील झाडांची पडताळणी करावी आणि नवीन झाडे लावली असतील तर त्यांच्या अचुक नोंदी घ्याव्यात,
सक्षम अधिकार्याने दिलेल्या झाड तोडणी परवानगीत नवीन झाडे लावण्याबाबत जो आदेश दिला असेल त्यानुसार झाडे लावलेली आहेत का याची तपासणी करावी, नवीन वृक्ष लागवडीस उत्तेजन द्यावे.
महाराष्ट्र वृक्षतोड व नियम कायदा १९६४, कलम ५(२)) अन्वये अव्वल कारकुनपेक्षा कमी नाही अशा अधिकार्यास कोणत्याही जमिनीत जाऊन वृक्ष तपासण्याचा तसेच अनधिकृत झाडे तोडल्याचे आढळल्यास अशी तोडलेली झाडे जप्त करण्याचा अधिकार आहे.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in