प्रश्न :-
वीस वर्षापूर्वीचा नोदणीकृत खरेदीदस्ताची नोंदीसाठी दिला आहे. काय कार्यवाही करावी?उत्तर :-
नोंदणीकृत कितीही जुना तर तो आपोआप रद्द होतो असे कोणत्याही कायद्यात नमुद नाही.
नोंदणीकृत खरेदी दस्त हा कितीही जुना झाला तरीही त्याची पत/किंमत (Value) कमी होत नाही. आणि खरेदीदाराचे नाव गाव दप्तरी दाखल करण्यात कोणतीही कायदेशीर बाधा येत नाही.
जमीन विकल्यानंतरही अद्याप खरेदी देणार याचेच नाव कब्जेदार सदरी तसेच असेल तर म.ज.म.अ. १९६६, कलम १४९ अन्वये कार्यवाही करावी. तसेच खरेदी घेणार याचेकडून म.ज.म.अ. १९६६, कलम १५२ अन्वये दंड वसूल करावा.
जर खरेदी देणार याने सदर जमिनीची अन्य व्यक्तीला पुन्हा विक्री केली असेल तर या जुना दस्त घेऊन येणार्यास त्याचा मालकी हक्क दिवाणी न्यायालयातून शाबीत करून आणण्यास सांगावे व दिवाणी न्यायालयाचा निकाल होईपर्यंत त्याचे नाव इतर हक्कात नोंदवावे.
Related Posts
Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in