F.S.I. चटई क्षेत्र निर्देशांक म्हणजे काय ?
एफ.एस.आय. (FSI) ज्यास मराठीमध्ये
चटई क्षेत्र निर्देशांक असे म्हणतात. भिंतीसह
बांधकामाचे सर्व मजल्यांचे मिळून एकूण क्षेत्र व ते बांधकाम ज्या
जमिनीवर-भूखंडावर करण्यात येत आहे,त्या जागेच्या एकूण क्षेत्रफळाबरोबर परवानगी देण्यात आलेले
एकूण बांधकामाचे क्षेत्र ह्यांचे प्रमाण होय. इमारतीच्या सर्व मजल्यांचे एकूण क्षेत्रफळ लक्षात घ्यावे लागते.
जमिनीच्या तुकड्यावर किंवा भूखंडावर साधारणपणे तेवढ्याच
क्षेत्रफळाचे म्हणजे एकास एक बांधकाम करायची
परवानगी असते,याचा अर्थ त्या जागेचा एफ.एस.आय हा 1 आहे.
1000 चौरस फुटांचा भूखंड-प्लॉट असेल आणि मंजूर
एफ.एस.आय. 1.5 असेल तर त्याचा अर्थ असा होतो की आपण 1500 चौरस फुटाचे
बांधकाम करू शकाल.
एफ.एस.आय. प्रमाणे बांधकाम करताना ऊउठ - ऊर्शींशश्रेिाशपीं उेपीीेंश्र ठर्शिींश्ररींळेप या नियमावली प्रमाणे करावे लागते. बांधकाम करताना मूळ बांधकामाला पूरक काही प्रकारचे बांधकाम ऋ.ड.ख. मधे धरले जात नाही.त्याची यादी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे किंवा स्थानिक नगररचना-नगरविकास विकासाकडे मिळते. बांधकाम विषयातील तज्ञामार्फत इमारतीचा आराखडा मंजूर करण्यासाठी अर्ज करणे आपल्या हिताचे आहे.