मालमत्तेचे हस्तांतरण कसे होते
?
वारसनोंद - मृत व्यक्तीचा मृत्युचा दाखला, अर्जदारांचे प्रतिज्ञापत्र, वारसांची मृत व्यक्तीशी नाते,
वारसांचा वर्ग लक्षात घेऊन,
वारसांचा अर्ज तपासून वारसनोंद केली जाते. वारसनोंदी बाबत वाद
उत्पन्न झाला तर, महसुली किंवा दिवाणी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे वारसनोंद होते.
मात्र दिवाणी न्यायालयाचा आदेश अंतिम मानला जातो. मृत व्यक्तीचा धर्म आणि त्या संबंधिचा कायदा लक्षात घेऊन वारस नोंद
केली जाते.
जमिनीचे वाटप - शेतजमिनीचे वाटप कायदेशीर वारसांच्या
परस्पर संमतीने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम
1966 च्या कलम 85 अन्वये मा. तहसिलदार यांचेकडे अर्ज
करून करता येते. शेतजमिनीच्या सरसनीरस वाटपासाठी
मोजणी खात्याची उपअधीक्षक तालुका भूमी अभिलेख यांची मदत घेतली जाते. हे
वाटप तुकडेबंदी-तुकडेजोड कायद्याच्या अधीन
राहून केले जाते.
जमीन मालमत्तेचे विभाजन परस्पर संमतीने नोंदविलेल्या
दस्ताने करता येते. पण तुकडेबंदी-तुकडेजोड कायद्याच्या अधीन राहून हे वाटप विभाजन केले जाते.
रूपये शंभर किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीच्या
मालमत्तेचे हस्तांतरण नोंदणीकृत दस्ताने केले जाते. खरेदीखत - < 100/- किंवा त्यापेक्षा जास्त किंमत असलेल्या मालमत्तेचा खरेदी व्यवहार
नोंदविलेल्या दस्ताने करावा.
गहाणखत - नोंदविलेल्या दस्ताने केले जाते.गहाणखताची नोंद
7/12 उताऱ्यावर इतर अधिकार सदरात केली जाते. बक्षीसपत्र - नोंदविलेल्या
दस्ताने केले जाते.बक्षीसपत्र काही अटींवर किंवा अटींशिवाय नोंदविता येते.
हक्कसोडपत्र - मोबदला घेऊन किंवा मोबदला न स्वीकारता केलेले हक्कसोडपत्र नोंदणीकृत
दस्ताने असावे. अदलाबदल - नोंदविलेल्या दस्ताने करावी.
दीर्घ मुदतीचा भाडेपट्टा - हा करार नोंदविलेल्या दस्ताने
करावा.
कुळहक्क - कुळाचा हक्क प्रथमत: फक्त तहसिलदार यांच्या
हुकुमाने प्राप्त होतो.
दत्तकपत्र - दत्तक घेण्याची प्रक्रिया दत्तक विधानाच्या
कायद्याने पूर्ण केली आहे का ? हे तपासल्यानंतर कायदेशीर ग्राह्य
मानावे.
पोटगी - सक्षम न्यायालयाच्या हुकुमाने ‘पोटगी’ म्हणून
स्थावर मालमत्तेचा हक्क मिळविलेला असावा.
मृत्युपत्र - फक्त स्वकष्टार्जित मालमत्तेबाबत मृत्युपत्र करता येते.
मृत्युपत्र नोंदविलेच पाहिजे असे नाही, साध्या कागदावर मृत्युपत्र करता येते. मृत्युपत्राच्या
प्रत्येक पानावर मृत्युपत्र करणाऱ्याने स्वाक्षरी/सही करावी. ज्या व्यक्तींना
किंवा त्यांच्या वारसांना मृत्युपत्रातील
मालमत्तेचा लाभ होणार नसेल अशा दोन त्रयस्थ व्यक्तींची मृत्युपत्रावर साक्षीदार
म्हणून सही असावी. मृत्युपत्र तयार करणारी
व्यक्ती मृत्युपत्र लिहीतेवेळी मानसिकदृष्टया सक्षम असल्याचा डॉक्टरांचा दाखला
हा मृत्युपत्रावरच घ्यावा. मृत्युपत्र
लिहिणारी व्यक्ती मृत झाल्यानंतर मृत्युपत्राचा परिणाम/अंमल सुरू होतो.
मृत्युपत्राच्या सत्यतेबाबत दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा.न्यायालयाकडून
‘प्रोबेट सर्टिफिकेट’ प्राप्त केलेले
मृत्युपत्र खरे मानले पाहिजे.मृत्युपत्राच्या लाभधारकांनी न्यायालयाकडून
‘प्रोबेट’ मिळविल्यानंतर मृत्युपत्रातील मालमत्तेचा लाभ ‘लाभधारक’ निर्वेधपणे घेऊ शकतील.
मृत्युपत्राने स्थावर मालमत्ता प्राप्त झालेल्या
व्यक्तीने पुढील हस्तांतरण करण्यासाठी आपल्याशी संपर्क साधला असेल तर ज्या मृत्युपत्राबाबत न्यायालयाने ‘प्रोबेट’
संमत केले आहे अशा मालमत्तेबाबत हस्तांतरणाचा व्यवहार करावा.