खरेदीचे पूर्ण पैसे दिलेले नाहीत अशी तक्रार असल्‍यास मंडलअधिकारी यांनी काय निर्णय घ्‍यावा?

प्रश्‍न :-

खरेदीचे पूर्ण पैसे दिलेले नाहीत अशी तक्रार असल्‍यास मंडलअधिकारी यांनी काय निर्णय घ्‍यावा?

उत्तर :-

: खरेतर अशा तक्रारीमध्ये तथ्य नसते.

पक्षकारास फसविल्‍याची खात्री वाटत असेल आणि तसे पुरावे त्‍याच्‍याकडे असतील तर त्‍याने पोलीसांत तक्रार करणे अपेक्षित आहे.

खरेदी दिल्यानंतर खरेदी देणार याला आपण कमी पैशात जमीन विकली आहे असा समज झालेला असतो किंवा खरेदीदाराला त्रास देणे अथवा त्याच्याकडून जास्त पैसे उकळणे या उद्देशाने या प्रकारच्‍या तक्रारी केल्या जातात. साधारणपणे व्यवहाराचे सर्व पैसे ताब्यात आल्याशिवाय कोणीही खरेदीदस्त नोंदणीकृत करण्याकामी स्वाक्षरीसाठी जात नाही. कोणत्‍याही तक्रारीवरून नोंदणीकृत दस्‍त रद्‍द करण्‍याचा अधिकार महसूल खात्‍यास नाही. दस्‍त नोंदणीकृत असल्‍यामुळे त्‍याची गाव दप्‍तरी नोंद होणे कायद्‍याने आवश्‍यक असते.

तथापि, चौकशी अंती अशा तक्रारीत तथ्‍य आढळून न आल्‍यास तक्रार फेटाळून लावावी व फेरफार प्रमाणित करावा.

Related Posts

Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in

إرسال تعليق