गाव नकाशात रस्‍ते दाखविण्‍याची काय पध्‍दत असते?

प्रश्‍न :-

गाव नकाशात रस्‍ते दाखविण्‍याची काय पध्‍दत असते?

उत्तर :-

गाव नकाशात एका गावावरून दुसर्‍या गावास जाणारे रस्‍ते दोन भरीव रेषांनी दाखविले जातात. यांची जमीन कोणत्‍याही भूमापन क्रमांकामध्‍ये समाविष्‍ट नसते.

  1. ग्रामिण गाडीमार्ग दोन तूटक रेषांनी दाखविले जातात. यांची जमीन भूमापन क्रमांकाध्‍ये पोटखराबा सदराखाली समाविष्‍ट असते. आणि यांची रुंदी अंदाजे 161/2 ते 21 फूट असते.
  2. पायमार्ग एक तूटक रेषेने दाखविले जातात. यांची जमीन भूमापन क्रमांकामध्‍ये पोटखराबा सदराखाली समाविष्‍ट असते. यांची रुंदी अंदाजे 81/4 फूट असते.
Related Posts

Refrence :
www.drdcsanjayk.info,
www.mahsulguru.in

إرسال تعليق